आगामी सणांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत नियमावली जाहीर

रत्नागिरी : मोहरम सण 31 जुलै 2022 ते 09 ऑगस्ट 2022 या कालावधीत 11 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा/रक्षाबंधन, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिन, 16 ऑगस्ट रोजी पारसी नूतन वर्ष व 18 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी व 19 ऑगस्ट रोजी गोपाळकाला हे सण साजरे करण्यात येणार आहेत.   जिल्ह्यामध्ये हे सण शांततेत पार पडावे, सण / उत्सव दरम्यान वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे व राजकीय संघर्षादरम्यान कोणताही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर तत्काळ मात करता याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍यांना 5 ऑगस्ट 2022 रोजीचे 00:01 वा. ते 19 ऑगस्ट 2022 रोजी 24:00 वा. पर्यंत पुढीलप्रमाणे अधिकार देण्यात आले आहेत.
(अ) रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणा-या मिरवणुकीतील किंवा रॅलीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे. (ब) अशा कोणत्याही मिरवणुका अगर रॅली कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळेत काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग किंवा वेळा विहित करणे.  (क) सर्व मिरवणुकीच्या, रॅलीच्या व जमायांच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांचे आसपास उपासनेचेवेळी वा कोणत्याही रस्त्यावरून वा सार्वजनिक जागी वा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार असल्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे.  (ड) सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर वा धक्क्यामध्ये वा सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, देवालये आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. (इ) कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे किंवा गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविणे वगैरेचे नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.  
(इ-अ)  आदेश लागू असलेल्या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लाऊड स्पिकर) लावल्याचे आढळल्यास  संबंधित व्यक्‍ती ही आदेशातील तरतुदी प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे कळवण्यात आले
आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button