खेड येथील गणेश विसर्जन कट्ट्यावर परप्रांतीय वास्तव्यास
गणेशोत्सवात गणेश विसर्जन दरम्यान भाविकांसाठी लाखो रुपये खर्चून गणेश विसर्जन कट्ट्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र याच गणेश विसर्जन कट्ट्यावर सद्यस्थितीत परप्रांतीय वास्तव्यास आहेत. या परप्रांतीयांच्या वास्तव्यामुळे सभोवतालचा परिसर अस्वच्छ होत असून या ठिकाणी विरंगुळ्यासाठी जाणार्या नागरिकांनी पाठच फिरवली आहे. नगरप्रशासनाने या बाबींकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परप्रांतीयांचे चांगलेच फावत आहे.जगबुडी नदीपात्रात गणरायाचे विसर्जन केले जाते. भाविकांच्या सोयीसाठी जगबुडी नदीकिनारीलगत गणेश विसर्जन कट्ट्यांची निर्मिती करण्यात आली आहे.www.konkantoday.com