सुकिवली चोरद नदीपात्रात धुतली जाताहेत खासगी वाहने
खेड तालुक्यातील सुकिवली चोरद नदीपात्रात वाहने धुणार्यांचे प्रकार थांबता थांबेनासे झाले आहेत. छोट्या मोठ्या वाहनांसह अजस्त्र क्रेनही वाहनचालकांकडून सर्रासपणे नदीपात्रात वाहने धुतली जात असल्याने ऑईल मिसळून पाणी दुषित होत आहे. काही दिवसाने याच नदीपात्रातून तहानलेल्या गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होणार आहे. मात्र प्रशासन अजूनही सुस्तच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चोरद नदीपात्र आरक्षित करण्यात आले आहे. नातूनगर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने चोरद नदीपात्र बारमाही वाहत असते. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांना पाणीटंचाई संपुष्टात येईपर्यंत याच नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. येथील पंचायत समितीकडे ५ गावातील १३ वाड्यांनी टँकरच्या पाण्यासाठी अर्जही दाखल केले आहेत. यामुळे लवकरच या गावांना टँकरने पाणीपुरवठाही सुरू करण्यात येणार आहे. मात्र तरीही नदीपात्रात सर्रासपणे वाहने धुतली जात आहेत. www.konkantoday.com