शिमगोत्सवासाठी दोणवली येथे जाणार्या दांपत्याच्या दुचाकीला अपघात, अपघातात पत्नीचा मृत्यू
शिमगोत्सवासाठी दोणवली येथे जाणार्या दांपत्याची दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. गुहागर-विजापूर मार्गावरील कोंढे येथे झालेल्या या अपघातात पतीदेखील गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाख करण्यात आले. अंकिता गौरव मिरगल (२१) असे मृत पत्नीचे नाव असून पती गौरव लक्षण मिरगल (२८, दोन्ही रा. दोणवली, चिपळूण) जखमी आहे.कोकणात अद्यापही शिमगोत्सवाची धामधूम सुरू असून पुणे, मुंबईतील भाविक गावच्या दिशेने येत आहेत. शिमगोत्सवासाठी गौरव मिरगल, अंकिता मिरगल हे दांपत्य दुचाकीने पुण्याहून तालुक्यातील दोणवली येथे जात होते. www.konkantoday.com