पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या पोर्टलवरून खरेदीसाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार
शासकीय कामांमध्ये होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात अससताना आता पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस (जीईएम) हे पोर्टल सुरू केले आहे.स्वराज्य संस्थांना गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस (जीईएम) पोर्टलवरून खरेदी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर वस्तूंची खरेदी करताना होणार्या गैरव्यवहारांना आळा बसणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थंकडून बांधकामासाठी दहा लाख व खरेदीसाठी तीन लाख रुपयांवर रक्कम असेल तर ई टेंडर प्रक्रिया राबविली जाते. त्या रक्कमेच्या आतील खरेदी अथवा बांधकाम असेल तर ऑफलाईन टेंडर पद्धतीने केले जाते.ही ऍफलाईन खरेदी करताना बहुतांशवेळा एकाच पुरवठादाराकडून बंद लिफाफे मागवून खरेदी करण्याचे प्रकार काहीवेळा घडतात. त्यातून, भ्रष्टाचाराला आमंत्रणे दिले जात असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्याला पायबंद घालण्याच्या उद्देशाने शासनाने ई मार्केट प्लेस नावाचे पोर्टल विकसित केले आहे. www.konkantoday.com