
चिपळूण नगर परिषदेच्या ऑनलाइन सभेत नगराध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीचे नगरसेवक आक्रमक
चिपळूण शहरात शौचालय बांधण्यासाठी नगराध्यक्षांनी 58/2 कलमाचा वापर केला होता. त्याविरोधात महाविकास आघाडीचे नगरसेवक सभागृहात ठराव मांडत असताना नगराध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी मुख्याधिकार्यांना धारेवर धरत नगराध्यक्ष मनमानी करत असल्याचा आरोप केला. 58/2 चा वापर झालेल्या कामांचे बील देवू नका असे लेखी निवेदन मुख्याधिकार्यांना महाविकास आघाडीकडून देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल पालिकेची ऑनलाईन सभा घेण्यात आली होती
www.konkantoday.com