
होळी स्पेशल गाड्यांमुळे कोकण मार्गावर विकेंडलाही १२ रेल्वेगाड्यांना लेटमार्क
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांसह होळी स्पेशल गाड्यांना सलग सुट्ट्यांमुळे उसळणार्या गर्दीत जागा मिळवताना प्रवाशांची चढाओढ सुरू असतानाच विलंबाच्या प्रवाशांची भर पडत असल्याने चाकरमान्यांचा मनस्ताप कायम आहे. रविवारी विकेंडलाही १२ गाड्यांचा लेटमार्क कायम राहिल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. सीएसएमटी मुंबई-मडगांव कोकणकन्या एक्सप्रेससह पनवेल-थिविम होळी स्पेशल तब्बल ४ तास विलंबानेच मार्गस्थ झाली. अन्य १० गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला.www.konkantoday.com