
वीजबील थकल्याने वीजकनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण
वीजबील थकल्याने वीजकनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील मंदरूळ येथे घडली आहे. मारहाण करणारे राजेश पवार हे मनसेचे माजी तालुकाध्यक्ष असून त्यांच्या विरोधात राजापूर पोलीस स्थानकात तकार दाखल करण्यात आली आहे.
राजापूर महावितरण उपविभाग-२ अंतर्गत येणाऱ्या मंदरूळ तिवंदामाळ येथील राजेश पवार यांचे सुमारे २१ हजार रूपयांचे वीजबील थकल्याने शाखा अभियंता रोहीत कुलकर्णी हे शनिवारी दुपारी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह पवार यांच्या घरी वीजकनेक्शन तोडण्यासाठी गेले होते.यावेळी राजेश पवार यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत कुलकर्णी यांना मारहाण केली. या प्रकरणी कुलकर्णी यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे
www.konkantoday.com