
पाली येथे अवैध गुरांची वाहतुक करणारी गाडी पोलीसांच्या ताब्यात
पाली येथे अवैध गुरांची वाहतुक करणारी गाडी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकऱ्यांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिली.३१ मार्चच्या मध्यरात्री अंजणारी येथुन पालीकडे जाणारी बोलेरो पिकअप गाडी क्र.MH37 T 3105 ही गुरांना दाटीवाटीने बांधुंन भरधाव वेगाने पालीच्या दिशेने जात आहे असे समजताच तात्काळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी ती गाडी पाली येथे पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केली. अधीक चौकशी केली असता वाहन चालकाला गुरे वाहतुक परवाना, वैध्यकिय प्रमाणपत्र व कशासाठी वाहतुक करत आहेत याची विचारणा केली असता उत्तर देता आले नाही. त्यामुळे सदर गुरे हि कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.व याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. www.konkantoday.com