नरेंद्र महाराजांच्या प्रेरणेतुन ५४ वे मरणोत्तर देहदान
_नाणीज येथील नरेंद्रचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून ५४ वे मरणोत्तर देहदान काल (दि. ३० मार्च) करण्यात आले. मुंबईतील वरळी सेवा केंद्राचे अध्यक्ष संतोष भगवान नार्वेकर (वय ६०, रा. वरळी कोळीवाडा, मुंबई) यांचे काल निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांकडून त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले.मुलगा संकेत संतोष नार्वेकर आणि नरेंद्र महाराज संस्थांनचे पदाधिकारी यांनी संतोष नार्वेकर यांचे पार्थिव नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलकडे सुपूर्द केले. या निर्णयाबद्दल संकेत संतोष नार्वेकर आणि नार्वेकर परिवाराचे संप्रदायाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली.यावेळी हॉस्पिटलमध्ये मुलगा संकेत संतोष नार्वेकर, पत्नी शर्मिला संतोष नार्वेकर, मुलगी समृद्धी संतोष नार्वेकर आदी उपस्थित होते. संस्थानच्या स्वस्वरूप संप्रदायाचे मुंबई जिल्हा निरीक्षक मनोज पाडावे, जिल्हा व्यवस्थापक शिवाजी करकरे, मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष मोरे, तालुका प्रमुख सुधाकर बांदकर, जिल्हा वैद्यकीय विभाग प्रमुख विकास भोसले, जिल्हा संजीवनी प्रमुख विनय पडवळ, तालुका विशेष कार्यवाह चंद्रकांत कदम, तालुका सचिव सत्यवान घोगळे, तालुका आध्यात्मिक प्रमुख एकनाथ आंब्रे, राजशिष्टाचार प्रमुख ओमकार नाईक, तालुका प्रमुख (मुंबई शहर) देवगण नार्वेकर तसेच इतर तालुका समिती सदस्य उपस्थित होते. www.konkantoday.com