
उन्हाच्या झळांमुळे जेल नाका येथील सिग्नल यंत्रणा १२.३० वाजता बंद करण्याची सामाजिक कार्यकर्ते तन्मय दाते यांची मागणी
_रत्नागिरी : जेल नाका येथील सिग्नल यंत्रणेचा वेळ कमी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तन्मय दाते यांनी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन वाहतूक पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे दिले आहे.रत्नागिरी शहरातील बंद असलेली सिग्नल यंत्रणा पुन्हा एकदा सुरू झाल्याने वाहतुकीला शिस्त लागली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. ही समाधानकारक बाब आहे. मात्र शहरातील जेल नाका येथील सिग्नल यंत्रणेची वेळ जास्त असल्याने कडक उन्हात वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या येथील सिग्नल दुपारी १.३० वाजता बंद होतो. पण उन्हाचा वाढता कडाका पाहता ही वेळ कमी केल्यास वाहनचालकांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे जेल नाका येथील सिग्नल यंत्रणा दुपारी १२.३० वाजता बंद करण्यात यावेत, असे तन्मय दाते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी विचारविनीमय करून सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली आहे.www.konkantoday.com