
शासनाच्या शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख ६० हजार रूपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना.
. मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख ६० हजार रूपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी द्वारे ४ टप्प्यात ४७ लाख ६० हजार रूपये काढल्याची माहिती समोर आली आहे.मंत्रालयातील बँक शाखेतून अज्ञात चोरट्यांनी पैसे काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकूण चार व्यक्तीच्या नावे ही रक्कम जमा झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मंत्रालयातील बँकेमध्ये शिक्षण विभागाचे खाते आहे. त्या खात्यातून हे पैसे काढण्यात आले आहेत. या प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलीस आधिक तपास करत आहेत.www.konkantoday.com




