शिळ्या आणि वास येणाऱ्या जेवणाच्या कारणावरुन आमदार संजय गायकवाड यांची कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण


आकाशवाणी आमदार निवासाच्या
शिळ्या आणि वास येणाऱ्या जेवणाच्या कारणावरुन आमदार संजय गायकवाड यांनी कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण वासातील कँटीनमध्ये मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. शिळ्या आणि वास येणाऱ्या जेवणाच्या कारणावरुन आमदार संजय गायकवाड यांनी कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
संजय गायकवाड यांनी कँन्टीनमध्ये दिल्या गाणाऱ्या जेवणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांचा आरोप आहे की, कँन्टीनमध्ये दिली गेलेली डाळ शिळी आणि वास येणारी होती. याबाबत कँन्टीन व्यवस्थापकाशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी व्यवस्थापकाला धारेवर धरत कठोर शब्दांत सुनावले.
आमदार निवासासारख्या उच्चस्तरीय ठिकाणी अशी घटना घडल्याने कर्मचारी आणि इतर आमदारांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. कँन्टीन कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची माहिती आकाशवाणी आमदार निवास प्रशासनाला देण्यात आली असून, तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button