
चांदेराई बाजारपेठेत शिरलें पुराचे पाणी, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची उडाली तारांबळ
* सतत धार कोसळणाऱ्या पावसामुळे चांदेराई मार्गे वाहणाऱ्या काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरण्यास सुरवात झाली आहे. संध्याकाळ नंतर नादिपात्रातील पाण्याची पातळी प्रचंड वेगात वाढू लागली व आता तर पाणी बाजारपेठेत शिरू लागले. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपला दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरवात केली आहे. दरवर्षीची ही समस्या सुटणार कधी असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत.




