सी व्हिजिल ॲपवर आतापर्यंत ३ तक्रारी दाखल ,१०० मिनिटात तक्रारीचे निवारण
__लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता पाळली जावी यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सतर्क आहे.आचारसंहिता भंगाची तक्रार देणे सोपे जावे यासाठी सी व्हिजिल अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपवर आतापर्यंत ३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. १०० मिनिटात त्याचे निवारण केले तसेच एनजीएसपी पोर्टलवरून १६ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत तसेच १९५० या हेल्पलाईन क्रमांकावरूनही वैयक्तीक तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. एकूणच आचारसंहितेबाबत नागरिकदेखील सतर्क असल्याचे दिसत आहे. राजकीय व्यक्ती तसेच नागरिकांकडून आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल या मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. सिटिजन अॅप अर्थात सी-व्हिजिल अॅपवर तक्रार दाखल होताच १०० मिनिटात त्याचे निराकरण केले जाते. राजकीय व्यक्तींबरोबरच नागरिकांकडून आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी निवडणूक विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे ऑडिओ, व्हिडिओ तसेच चित्रात्मक पुरावे सी व्हिजिल अॅपवरून पाठवता येतात. आचारसंहिता सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील ३ व्यक्तींच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत; मात्र, यापैकी दोन वैयक्तीक तक्रारी होत्या तर एक तक्रार राजकीय पक्षाने उभारलेल्या फलकाबाबत होती; मात्र, जिल्हा प्रशासनाने या तक्रारीचे निराकरण १०० मिनिटांच्या आत केले तसेच १९५० या क्रमांकाच्या हेल्पलाईनवरूनही आतापर्यंत १६ तक्रारी दाखल झाल्या आहेत.मात्र, या तक्रारी आचारसंहितेशी संबंधित नसल्याचे सांगण्यात आले. यात मतदारयादीत नाव नसणे, मतदारयादीतील नावात बदल, पत्त्यात बदल आदींविषयी मार्गदर्शन विचारले आहे.www.konkantoday.com