
शासकीय कर्मचार्यांना ऑनलाईन रजा अर्ज सक्ती
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना १ एप्रिलपासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ई-एचआरएमएस या प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे कोणता अधिकारी कर्मचारी रजेवर आहे हे एका क्लिकवर समजण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रलंबित ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे.सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदभांत आदेश गुरूवारी काढले आहेत. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकविषयक बाबींसंदभांत ई-एचआरएमएस (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचार्यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधिनस्त कार्यालयांचा समावेश या नवीन प्रणालीत करण्यात येत आहे. या नवीन प्रणालीवर सर्व अधिकारी, कर्मचार्यांची सेवा पुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ३ मार्च २०२३ च्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com