कोकण रेल्वेतून चाकरमान्यांचा लटकंतीचा व रेटारेटीचा प्रवास
_शिमगोत्सवासाठी कोकण मार्गावरून धावणार्या नियमित गाड्यांसह होळी स्पेशल विक्रमी गर्दीने धावत आहे. ग्रामदेवता पालखीच्या दर्शनासह सलग सुट्ट्यांमुळे चाकरमान्यांचा गावी येण्याचा ओघ अजूनही सुरूच आहेे. शुक्रवारीही दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून चाकरमान्यांना अक्षरशः लोंबकळत अन रेटारेटीचा प्रवास करत गाव गाठावे लागले. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अन्य गाड्या तही अशीच अवस्था आहे मुंबई गाठताना देखील चाकरमान्यांची अशी अवस्था आहे रेल्वे प्रशासनाने आणखी जादा होळी स्पेशल चालवण्याची तसदी न घेता एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटा सुरूच ठेवल्याने गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होत आहे.शिमगोत्सवासाठी गावी येणार्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. तरी देखील रेल्वे प्रशासनाने अवघ्या १२ होळी स्पेशल चालवल्याने चाकरमान्यांना अजूनही गाव गाठताना यातायात करावी लागत आहे. दिवा-चिपळूण मेमू स्पेशलच्या विस्तारीत फेर्या १५ मार्चपासून रद्द करण्यात आल्याने चाकरमान्यांच्या नियोजनावर पाणी फेरले होते. मेमू स्पेशलच्या बदल्यात चाकरमान्यांच्या नजरा पर्यायी गाडीकडे लागलेल्या असतानाच रेल्वे प्रशासनाने नकारघंटा वाजवल्याने सार्यांचाच भ्रमनिरास झाला. www.konkantoday.com