विद्यार्थ्यांने “आता माझी सटकली” डायलॉग मारतात गुरुजींची पण – – – -!

लहानांपासून मोठय़ांना चित्रपटाचे आकर्षण असते त्यामुळे त्यातील डायलॉग अनेक वेळा आपल्याला पाठ असतात असाच एक डायलॉग विद्यार्थ्याने शाळेत मारतात त्याला गुरुजींचे फटके खावे लागले. मात्र त्याच्या पालकांनी आता गुरुजींच्या विरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे .चिपळूण खेर्डी दातेवाडी येथील शाळेत सहावीत शिकणारा युवराज परमेल या विद्यार्थ्याने भर वर्गात डोळ्याला गोगल लाऊन बेंचवर चढून “आता माझी सटकली” हा सिंघम स्टाईल डायलॉग मारला.हा प्रकार तेथून जाणाऱ्या गुरुजींना दिसतात त्यांना ही हा डायलॉग आठवला . त्यांनी हातातील पट्टीने विद्यार्थ्याला ठाेकून काढले आता हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही तर मुलाच्या पालकांनी गुरुजींनी मारल्याने मुलगा जखमी झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button