संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावरीलकरंबेळे घाटात रस्ता खचल्याने वाहनांना धोका
_संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावरील करंबेळे घाटामध्ये रस्ता कोसळल्याने राज्य मार्ग धोकादायक बनलेला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरकडे जाणारा हा जवळचा मार्ग आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गावरून धावत असतात. संगमेश्वर तालुक्याचे देवरूख हे शासकीय कार्यालय असल्याने ग्रामस्थ तसेच पालकवर्ग विद्यार्थीवर्ग देवरूखकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करत असतात. याच मार्गावर माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय असल्याने शाळेतील विद्यार्थी ये-जा करण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात. मात्र या मार्गावर करंबेळे घाटात दरड कोसळत असल्याने दरड रस्त्याच्या बाजूला घेवून हा मार्ग धोकादायक बनला आहे.www.konkantoday.com