
शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली
_लोकसभा निवडणुकीसाठी येत्या काही दिवसांतच प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील. त्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेनेही आपल्या स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ४० स्टार प्रचारकांचा समावेश आहे.या स्टार प्रचारकांमध्ये सुभाष देसाई, खासदार संजय राऊत , अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे.याबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पक्षाचे सचिव आदेश बांदेकर, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी हे देखील प्रचारकांच्या यादीत आहेत. Www.konkantoday.com