
वरंध घाट1 एप्रिल पासून 31 मे पर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश
__म्हाप्रळ भोर मार्गे पुणे येथे जाणार्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला या मार्गावरील राजेवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दी पर्यतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.मात्र वरंध घाटातील रुंदीकरणाचे काम व संरक्षक भिंतीचे काम चालु वाहतुकीमध्ये पावसाळ्यापुर्वी करणे अशक्य असल्याने हा मार्ग 1 एप्रिल पासून 31 मे पर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी बजावले आहेत.कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बंद केल्याने येथील प्रवाशांना पुन्हा ताम्हाणे अथवा महाबळेश्वर मार्गे पुणे असा लांबचा खर्चिक वळसा घालावा लागणार आहे. पावसाळ्यात होणार्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने, रस्ते व संरक्षक भिंती वाहून गेल्याने भोर मार्गे पुणे जाणारा मार्ग गेल्या दोन तीन वर्षांपासून पावसाळ्यात बंद ठेवण्यात येत आहे. या मार्गाच्या मजबुतीकरणाचे काम दोन वर्षा पासून सुरु आहे.www.konkantoday.com




