लांजा शहराला एप्रिल अखेरपर्यंत पुरेसे पाणी
लांजा तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी तालुक्यातील टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून २ कोटी ३७ लाख ७५ हजारांचा निधी अपेति आहे. तसेच लांजा-कुवे नगर पंचायत हद्दीतील लांजा शहरात पाणीपुरवठा करण्याचा मुख्य स्त्रोत बेनी नदी तर कुवे भागात धरण आहे. दरवर्षी मे महिन्यापर्यंत लांजा शहरात पाणीपुरवठा करण्यास नगर पंचायत प्रशासनाला मुबलक पाणी उपलब्ध असल्याने अडचणी येत नाही. परंतु नगर पंचायत हद्दीतील देवराई या एकमेव भागात मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे मे महिन्यापासून पाऊस सुरू होईपर्यंत नगर पंचायतीला देवराईमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असतो.www.konkantoday.com