राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली
कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. सध्या ते वैद्यकीय कारणामुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहे.शनिवारी दुपारी नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांची मुलगी सना मलिक हिने दिली. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात आप्तकालीन कक्षात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांना श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागल्यानंतर ते रुग्णालयात आले. मलिक यांच्यावर आता कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.www.konkantoday.com