
शुक्रवार दि२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी जनमोर्चा
केंद्र शासनाने सन २०२१-२२ ची सार्वत्रिक जनगणना जातनिहाय करावी या आग्रही मागणीसाठी शुक्रवार दि२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी जनमोर्चा व ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्यावतीने धडक मोचार्चे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा .मारुती मंदिर येथून निघणार असून जिह्यातील सर्व नऊ तालुक्यांमधून ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार अलुतेदार वगार्तील समस्त बंधू भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी सुध्दा ओबीसी अंतर्गत येणाऱ्या सर्वांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी जनमोचार्चे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केले आहे.
www.konkantoday.com