महावितरणच्या वीजबिलावर चक्क शासनाची जाहिरात
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही येथे महावितरणने शासनाची जाहिरात असलेली वीजबिले वाटली. हा प्रकार बुधवारी काहींनी अधिकार्यांच्या लक्षात आणुन देताच रातोरात नवी बिले तयार करण्यात आली. त्याचे गुरूवारपासून वाटप सुरू झाले असून जाहिरात असलेली व वाटलेली बिले ताब्यात घेतली जात आहेत.गेल्या काही वर्षापासून सरकारने आपल्या कामाची संधी मिळेल. त्या ठिकाणी जाहिरात करण्याची नवी शक्कल आणली आहे. पूर्वी वीजबिलही सुटलेले नाही. पूर्वी वीजबिलावर कंपन्यांच्या जाहिराती दिसून यायच्या मात्र आता कंपन्यांच्या जाहिराती कमी झाल्या असून सरकारच्या विविध योजनांच्या जाहिराती झळकताना दिसत आहेत. मात्र सध्या आचारसंहिता असल्याचे भान महावितरणलाा राहिले नसल्याने त्यांनी शासनाची जाहिरात असलेली बिलेच वाटली आहेत.लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तिथे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत. असे असताना सध्या मार्च महिन्याच्या वीजबिलांचे वाटप सुरू आहे. त्यातील बहुतांशी बिलांवर सुराज्य ही शासनाची जाहिरात असून त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा फोटो आहे. त्यामुळे बुधवारी बिले हातात पडताच हा आचारसंहितेचा भंग नाही का, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे त्यांनी याबाबत महावितरण येथील अधिकार्यांना विचारले. त्यामुळे त्यांनी यात विशेष लक्ष घालून रातोरात नवी बिले छापून घेतली. त्यावर आाता कंपनीची जाहिरात छापण्यात आली आहे. www.konkantoday.com