बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर
अजित पवार गटाने अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरु होत्या, त्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत.बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, ”दोन उमेदवार यापूर्वी जाहीर केले आहेत. यातच बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने मीही अधिकृत घोषणा करतोय.”www.konkantoday.com