पॅड डिसपोझिबल मशिन नसणार्या गावांना नोटीस
ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड डिस्पोझेबल मशीन बसविण्यासंदर्भात असलेली योजना जिल्ह्यातील अनेक गावांनी अद्याप राबवलेली नाही. अशा गावांना आता जिल्हा परिषदेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसीनंतर आता उर्वरित सर्व ग्रामपंचायतींमध्ये पॅड बसवण्याची लगबग सुरू झाली आहे. तरूण भारत संवादच्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाचा भोंगळ कारभार उघड झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेने संबंधित पॅड डिस्पोझेबल मशीन बसवले मात्र ते वापरा हे सांगायला मात्र विसरल्याचेच दिसत आहे. जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींमध्ये हे मशीन बसवण्याचे निर्देश होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात फक्त ५७८ ग्रामपंचायतींनीच हे मशीन बसवले आहे. मात्र या मशीनचा वापर नक्की कसा करायचा आणि मुळात मशीन गावात कुठे बसवले आहे याची माहिती त्या गावातील महिलांनाच नसल्याने आजही वापरलेले सॅनिटरी पॅड तसेच कचर्यात टाकले जात आहेत.याबाबत जागतिक बँकेने पुढाकार घेवून सर्व ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी वितरित करण्यात आला. मात्र ग्रामपंचायतींना हा निधी नक्की कशासाठी वापरायचा, याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाकडून देण्यात आला नाही. त्यामुळे अद्याप जिल्ह्यातील २०८ ग्रामपंचायतींमध्ये हे पॅड डिस्पोझेबल मशिन बसविण्यातच आलेले नाही. ज्या ग्रामपंचायतींमध्ये हे मशीन बसवले आहे तिथल्या महिलांना या मशिनची माहितीस नसल्याचे आता समोर येत आहे. www.konkantoday.com