
दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे कमानीवर बॅनर बांधत असताना पडल्याने वृद्धाचा मृत्यू
_दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी येथे कमानीवर बॅनर बांधत असताना पडल्याने राहील रतन जाधव या ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३२ च्या सुमारास घडली.पोलिसांच्या माहितीनुसार राहुल जाधव हे वाडीतील ग्रामस्थांसह वाडीच्या रस्त्यावरील कमानीला उदघाटनापूर्वी बॅनर बांधण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव हे कमानीवर बॅनर बांधत असताना कमानीवरून खाली रस्त्यावर पडले. ते बेशुद्ध अवस्थेत असताना ग्रामस्थांनी त्यांना दापोली येथील भागवत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. www.konkantoday.com