चिपळूण नगरपरीषदेच्या अग्निशमनच्या इमारतीवर ठेकेदाराचा कब्जा,ठेकेदाराने आपले साहित्य ठेवण्यासाठी त्याचे गोडावून केले
_चिपळूण शहरातील मार्कंडी भागात लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या अग्निशमन केंद्रावर सध्या ठेकेदाराने कब्जा मिळवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नगर परिषदेकडून वापर होत नस्याने या ठेकेदाराने आपले साहित्य ठेवण्यासाठी त्याचे गोडावून केले आहे. तसेच वाहनांचे पार्किंगही येथे केले जात आहे.काही वर्षापूर्वी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून ही इमारत उभारली आहे. मात्र २०२१ साली आलेल्या महापुरात ही इमारत बुडून नगर परिषदेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अग्निशमन विभागाचा कारभार बुरूमतळी या सुरक्षितस्थळी स्थलांतरित केला आहे. त्यामुळे सध्या या इमारतीत नगर परिषदेची खराब झालेली जुनी वाहने कित्येक महिन्यांपासून ठेवण्यात आली आहेत.असे असताना आता या इमारतीच्या रिकाम्या भागात खासगी वाहने पार्किंग केली जात असून बांधकाम ठेकेदाराचे सर्व साहित्य येथे ठेवले जात आहे. एवढेच नाही तर त्यांचे कामगारही याच इमारतीत राहत आहेत. यामुळे या इमारतीचे खाजगीकरण झाले की काय अशी शंका नागरिकांना येत आहे. दोन दिवसांपूर्वी तर येथे सिमेंटचा मोठा साठाही करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या इमारतीचा बिनधास्तपणे वापर करणार्या या ठेकेदाराला नेमका कोणाचा पाठिंबा आहे असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.www.konkantoday.com