
इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर अल्पवयीन मुलांचे अश्लिल व्हिडिओ प्रसारित करणार्याला पोलिसांनी चांगला इंगा दाखविला
_इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर अल्पवयीन मुलांचे अश्लिल व्हिडिओ प्रसारित करणार्याला पोलिसांनी चांगला इंगा दाखविला आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही घटना शनिवार 23 जून 2022 रोजी घडली असून याबाबत गुरुवार 28 मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन वाभिटकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने आपल्या मोबाईलवरुन इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर 3 ते 4, 5 ते 6 वर्ष वयोगटातील दोन लहान मुलांचा 3.16 एम.बी क्षमतेचा पॉर्न व्हिडिओ 23 जून 2022 रोजी प्रसारित केला होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.www.konkantoday.com