आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीत स्थानिक समस्या दुर्लक्षित
विविध कारणांमुळे सहा वर्षे रखडलेल्या आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या कामकाज गेल्या दोन हंगामात युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र ठेकेदार स्थानिक गुंतागुंतीच्या भौगोलिक रचना, चढ, तीव्र उतार, नागमोडी वळणे यांचा वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने विचार न करताच काम करताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. कामाच्या गुणवत्तेबद्दल स्थानिक साशंक असून त्यांच्या तक्रारींकडेही संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने भविष्यातील अडचणींनी आतापासूनच डोके वर काढायला सुरूवात केली आहे.महामार्ग अंतर्गत तालुक्यातील म्हाप्रळ ते पाचरळ या दोन गावांच्या हद्दीतील सुमारे २२ कि.मी. अंतरात दोन पदरी कॉंक्रीटीकरण असलेल्या रस्त्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. याचबरोबर पाचरळ ते आंबडवे या दोन पदरी रस्त्याच्या कामासाठी गतवर्षी जागोजागी खोदाई करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावसाळ्यात विविध अडचणींना स्थानिकांना सामोरे जावे लागले.केंद्र शासनाने गेल्या दहा वर्षात देशात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते अगदी लिलया उभे केले. मात्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मुळगावास महानगरांना गाडी मार्गाने कमी वेळेत जोडणार संसद आदर्श ग्राम योजनेतील समाविष्ठ हा प्रक्प मात्र पूर्ण होण्यास सहा वर्षांचा कालावधी लागला आहे. सद्य स्थितीत म्हाप्रळ ते चिंचाळी, शेनाळे ते शिरगाव व मंडणगड शहरातील पालवणी फाटा चेकपोस्ट ते पाचरळ या अंतरात रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रस्त्याचे काम केंद्र शासनाचे अखत्यारित असल्याने प्राधिकरणाच्या निगरानीखाली काम करताना ठेकेदार, स्थानिक गुंतागुंतीच्या भौगोलिक रचना, चढ, तीव्र उतार, नागमोडी वळणे यांचा वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने विचार न करताच काम करताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळे स्थानिकांच्या योग्य सूचनांचा काम सुरु असतानाच विचार करणे गरजेचे आहे. www.konkantoday.com