शिमगोत्सवात आगमन झालेल्या राजापुरातील उन्हाळेत गंगास्नानासाठी भाविकांची गर्दी
ऐन शिमगोत्सवात रविवारी राजापूर शहरालगतच्या उन्हाळे गावी गंगामाईचे आगमन झाले आहे. गंगाआगमनाची बातमी सर्वदूर पसरल्याने आता भाविक गंगामाईच्या पवित्र पाण्याने स्नान करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते व जवळपास तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते, असा प्रघात आहे. मात्र अलिकडच्या कालावधीत तिच्या या आगमन व निर्गमानच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती. काही वर्षापूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खूपच लांबला होता. पूर्वी तीन वर्षानंतर प्रकट होणार्या गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे गंगा आगमनाच्या काळात गंगाक्षेत्राचा परिसर भाविकांनी फुलून जात आहे. तसेच या परिसरात विविध दुकाने, हॉटेल्सच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढालही होत होती. मात्र आता सातत्याने गंगामाई प्रकट होत अस्याने पूर्वीचा भाविकांचा ओढा कमी झायाचे चित्र गंगाक्षेत्री पहायला मिळत आहे. www.konkantoday.com