
वाशी बाजारात हापूसचे दर स्थिर ठेवा, रत्नागिरीतील आंबा बागायतदारांची मागणी
यंदाच्या हंगामातील हापूस आंबा बाजारात दाखल होण्यास सुरूवात झाली असताना नवी मुंबईच्या वाशी बाजारात या आंब्याचे दर कोसळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याचे दर आतापासूनच उतरवल्यास बागायतदार शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे दर स्थिर ठेवण्याची मागणी येथील आंबा उत्पादक शेतकर्यांनी केली. दि फ्र्रूट ऍण्ड व्हेजिटेबल मर्चंटस असोसिएशनकडे केली आहे.रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, बावा साळवी, राजेंद्र कदम, अजित शिंदे यांच्यासह उदय बने, परशुराम कदम अशा सुमारे पंधरा ते वीस बागायतदारांनी वाशीतील दलालांशी यासंदर्भात मंगळवारी चर्चा केली. या चर्चेवेळी आमदार नितेश राणे यांनीही सिंधुुदुर्गमधील आंबा बागायतदारांच्या समस्या मांडल्या. या बैठकीत वाशी बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांच्यासह अन्य व्यावसायिक उपस्थित होते.www.konkantoday.com