लांजायेथील बसस्थानकात उभारलेल्या शौचालयाची टाकी ओव्हर फ्लो होऊन सर्वत्र घाणीचे पाणी
__लांजा येथील बसस्थानकात उभारलेल्या शौचालयासह तेथील टाकी वाहू लागल्यामुळे आतील घाण पाणी सर्वत्र पसरले होते. त्याचा त्रास जवळच्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे याबाबत तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. याबाबतचे निवेदन लांजा एसटी आगार व्यवस्थापक तसेच आरोग्य विभागाला दिले आहे. लांजा बसस्थानकात सहा महिन्यांपूर्वी नव्याने शौचालय उभारले होते. या शौचालयाची टाकी ओव्हर फ्लो होऊन सर्वत्र घाणीचे पाणी हे इमारतीच्या बाजूला वाहत आहे. त्यामुळे या बसस्थानकाच्या बाजूला असणाऱ्या निवासी तसेच व्यापारी संकुलातील इमारतीमधील नागरिक, व्यापाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.www.konkantoday.com