मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामासाठी स्वच्छतागृहे तोडल्याने प्रवाशांचे हाल
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. या कामांतर्गत महामार्गालगतच्या अनेक प्रवासी निवारा शेड, स्वच्छतागृहे तोडली गेली. यामुळे प्रवासी, वाहतूकदार आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी महामार्गावर तातडीने स्वच्छतागृहांची उभारणी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष व खडपोलीचे सुपुत्र संतोष कदम यांनी केली आहे.www.konkantoday.com