पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिल पासुन सुमारे अडीच टक्क्यांनी वाढीव टोल

_पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिल पासुन सुमारे अडीच टक्क्यांनी वाढीव टोल वसुली करण्यात येणार आहे. ठेकदार टोल रोड प्रशासनामार्फत याबाबतचं पत्रक प्रसिध्द करण्यात आल्याची माहीती विभागीय प्रमुख अमित भाटिया यांनी दिली आहे. टोलच्या वाढीव रकमेनुसार कार, जीपसह हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार आहे. थोडक्यात आतापर्यंत घेण्यात येणारा 115 रुपये दर आता 120 रुपये होणार आहे. हलक्या व्यवसाईक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होत असुन, या वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये द्यावे लागणार आहेत.बस ट्रक साठी टोलच्या रकमेत दहा रुपयांची वाढ होणार असुन आता या वाहनांना 400 रुपये दर द्यावा लागणार आहे. जड वाहनांसाठी 415 रुपयांवरुन पाच रुपये वाढुन 420 रुपये होणार आहे. तर, बरोबरच अवजड वाहनांसाठीच्या 615 रुपये टोल मध्ये 15 रुपयांची वाढ होणार असुन अवजड वाहनांना आता 630 रुपये टोल द्यावा लागणार आहे. जड आणि अवजड वाहनांच्या टोल रकमेमध्ये तुलनेनं जास्त वाढ झाली असल्याचं या आकडेवारीवरून लक्षात येतं. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button