चिपळूण नगरपरिषदेने एका दिवसात केली १४ लाखांची कर वसुली

चिपळूण नगरपरिषदेने कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बुधवारपासून थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची कारवाई नगर परिषदेकडून केली जाणार होती. मात्र मुख्याधिकारी विशाल भोसले स्वतः प्रभागामध्ये फिरल्याने अनेकांनी कर भरला. त्यामुळे एका दिवसात १४ लाख रुपयांची वसुली झाली. असे असले तरी गुरूवारपासून कारवाईचा वेग आणखी वाढवला जाणार आहे. आतापर्यंत पाणी व घरपट्टीची मिळून १० कोटी ३९ लाख ८०५ रुपयांची वसुली झाली आहे. तर दुसरीकडे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरूच ठेवण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button