
घुडेवठारमध्ये बाग, जलतरण तलाव विकसित करण्याचा नगर परिषदेचा मार्ग मोकळा
रत्नागिरी शहरातील घुडेवठार येथे बाग आणि जलतरण तलावासाठी आरक्षित केलेला भूखंड विकसित करण्यासंबंधी नगर परिषदेचा मार्ग मोगळा झाला आहे. जागामालकाने प्रस्तावित जागेसमोरील घर तोडू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. तसेच नगर परिषदेकडून ४ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या संबंधी नगर परिषदेच्या बाजूने निकाल देत जागामालकाला घर खाली करण्याचा आदेश दिला. www.konkantoday.com