एप्रिल-मे महिन्यात वाढीव वीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांबरोबरच औद्योगिक आणि वाणिज्यक वीज ग्राहकांच्या डोक्यावर बोजा

वीज नियामक आयोगाने एका वर्षाच्या नियंत्रण कालावधीसाठी मंजूर केलेली वीज दरवाढ नव्या आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिलपासून लागू होणार आहे.त्यानुसार महावितरणच्या दरात वाढ होणार आहे. अशात उन्हाळ्यामुळे सध्या विजेच्या मागणीत मोठी वाढ नोंदली जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या एप्रिल-मे महिन्यात वाढीव वीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांबरोबरच औद्योगिक आणि वाणिज्यक वीज ग्राहकांच्या डोक्यावर बोजा पडणार आहे. वीज नियामक आयोगाकडून बहुवार्षिक वीज दरवाढ केली जाते. त्यानुसार २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीसाठी वीज आयोगाने जनसुनावणी घेत मार्च २०२० मध्ये पाच वर्षासाठी वीजदर निश्चित केले होते. त्यानंतर आयोगाने मागील वर्षों २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षासाठीच्या महसुली आवश्यकतेचा आढावा घेत दर निश्चित केले तसेच टाटा पॉवरच्या वीज दरवाढीबाबत नुकतेच आदेश दिले आहेत. त्यानुसार १ एप्रिलपासून महावितरण, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरचे नवे वीजदर लागू होणार आहेत.दरवाढीबरोबरच विजेचा वाढता वापर हेही बिल फुगण्याचे प्रमुख कारण आहे. ग्राहकांच्या वीज वापर गटानुसार विजेचे वेगवेगळे दर आहेत. यात ०-१०० युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकाला पहिल्या टप्प्यातील सर्वात कमी वीजदर लागतो. एखाद्या ग्राहकाचा १० किंवा ९९ युनिट वीज वापर असला तरी पहिल्या टप्प्याचा दर लागतो; मात्र ९९ युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकाचा वीज वापर केवळ दोन युनिटने वाढला तरी तो १०१-३०० युनिट वीज वापराच्या गटात जातो. त्यामुळे त्याला पहिल्या गटाच्या तुलनेत ५०-६० टक्के जास्तीचा दर लागतो. त्यामुळे वीजबिलात मोठी वाढ होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button