
संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी पदावर डॉ. गोविंद मोरे यांची नियुक्ती
संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी पदी सांगली कडेगाव येथील डॉ. गोविंद धनाजी मोरे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. मोरे यांनी या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेरॉन सोनावणे यांची बदली झाल्याने या पदाचा कार्यभार प्रभारी म्हणून डॉ. व्ही. आर. रायभोळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यांनी उत्कृष्टपणे कारभार हाकला. तालुक्याला कायमस्वरूपी अधिकार्याची आवश्यकता होती.यानुसार तालुक्यात आरोग्य अधिकारीपदी डॉ. गोविंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मोरे यांची आरोग्य खात्यातील सेवेची सुरूवात संगमेश्वर तालुक्यातून तालुका आरोग्य अधिकारी म्हणून झाली आहे.www.konkantoday.com