
वैद्यकीय बिलांच्या गोलमाल प्रकरणी त्या वैद्यकीय अधिकार्यांची चौकशी होणार
लांजा तालुक्यातील वैद्यकीय बिलांच्या गोलमाल प्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी होणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांची तू तू मै मै अशी टोलवाटोलवी सुरू असताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्यकीय बिलांच्या गोलमाल प्रकरणात कोणती भूमिका घेतात याकडे आता लक्ष वेधून राहिले आहे.www.konkantoday.com