विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची कणकवली, रत्नागिरीत जाहीर सभा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत दि. २९ मार्च ते दि. ११ एप्रिल या कालावधीत गावभेट दौरा करणार आहेत. दि. २८ मार्चला रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची विशेष बैठक होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, आप आदी पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या कणकवली, रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहेत.खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली. माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडी पदाधिकार्‍यांची पहिली बैठक संपन्न झाली असून त्यांनी आपला प्रचार करून निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button