राजापूर येथील व्हेल उलटीच्या तस्करीतील संशयिताला अटकपूर्व जामीन
राजापूर येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणातील पाचव्या संशयिताला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. राजेंद्र शांताराम आंगले (५५, रा. फुपेरे पोस्ट आंगले ता. राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ताम्हाणे-पाचल रस्त्यावर व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणात राजेंद्रविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यातील अन्य चौघा संशयितांना राजापूर वनविभागाच्या टीमने थरारक पाठलाग करत ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.अटक केलेल्या तिघा संशयितांकडून वनविभागाकडून कसून तपास करण्यात आला. तपासात राजेंद्रचाही सहभाग उघड झाल्याने त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. आपल्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने राजेंद्रच्यावतीने रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाख करण्यात आला. www.konkantoday.com