
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील शिरगाव येथील राहणारे पोलीस अंमलदार रोहित रमेश किलजे यांचे मुंबईत ड्युटीवर जात असताना रेल्वेतून पडून निधन
_कर्तव्याला जाण्यास निघालेल्या २५ वर्षीय पोलीस अंमलदार रोहित रमेश किलजे यांचे धावत्या रेल्वेतून पडल्याने निधन झाले किलजे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील शिरगाव येथे राहणारे होते. ते ताडदेव ल विभागात कर्तव्याला होते. ते अनुकंपावर भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. रोहित हे नेहमी प्रमाणे डोंबिवली स्थानकात आले. फलाट क्रमांक ५ वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. प्रचंड गर्दीमुळे कोपर स्थानक येण्यापूर्वी ते धावत्या गाडीतून पडले. या अपघाताची माहिती प्राप्त होताच डोंबिवली लोहमार्ग पोलीस तात्काळ अपघातस्थळी गेले. जखमी अवस्थेत त्यांना केडीएमसीच्या शास्त्री रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी २६/२४ नुसार अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रोहितचा म अंत्यविधी रत्नागिरी जिल्ह्यातील (ता. चिपळुण) शिरगाव या मूळगावी करण्यात आला www.konkantoday.com