मुंबई-गोवा महामार्गावरील शिवफाटा येथे अपघातात ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील शिवफाटा येथे रस्ता ओलांडत असताना कारने दिलेल्या धडकेत ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. राजाराम गणपत काणेकर (रा. मोरवंडे-सुतारवाडी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी संदीप हरिश्‍चंद्र काणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय कशिोर पवार (२८, रा. पवारवाडी-चिपळूण) यांच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय पवार हा आपल्या ताब्यातील एक्स.यु.व्ही. गाडी क्रमांक एम.एच. ०८ ए. एक्स. ३४४७ घेवून मुंबई ते चिपळूण जात असताना शिवफाटा येथे घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडणार्‍या वृद्धास धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजाराम काणेकर यांचा मृत्यू झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button