भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना आज अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर
_भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना आज अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत.भाजपकडून आज देशातील विविध राज्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली. हा उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून नवनीत राणा आहेत. भाजपकडून याआधी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने याआधी दोन टप्प्यात उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव आहे.नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून विरोध केला जात होता. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपला नवनीत राणा यांना विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे.www.konkantoday.com