पुलावरून गाडी उलटल्यानंतर ठेकेदाराला सुचले शहाणपण पत्रे लावून तात्पुरत्या स्वरूपात संरक्षण कठडा केला उभा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या सोनवी पुलावरून मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी संरक्षण कठडा तोडून पुलावरून खाली कोसळली. त्यानंतर ठेकेदाराला जाग आली असून त्याने तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याच्या स्वरूपात संरक्षण कठडा उभारला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटीश काळातील सोनवी पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी गाडी पत्र्याच्या तकलादू संरक्षण कठडा तोडून खाली कोसळली. या अपघातात पाचजण जखमी झाले मात्र वारंवार मागणी करूनही सुरक्षित संरक्षण कठडे न बसवल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सद्यस्थितीमध्ये सुरू आहे.www.konkantoday.com