
डॉक्टर, नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला लावणार नाही-मुंबई उपनगर जिल्हाधिकारी
अत्यावश्यक सेवेतील कोणत्याही कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला लावणार नाही, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले.मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालयांतील डॉक्टर, नर्सेस आणि रक्त चाचणी करणारे तंत्रज्ञ यांना मंगळवारी मुंबई उपनगरांतील निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालये चालवायची कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर होता.www.konkantoday.com