
जल फाऊंडेशनच्या कार्याबद्दल समाजभूषण विघ्नहर्ता पुरस्कार जाहीर
ग्रामीण भागात ग्रामस्थांना वर्षानुवर्षे सतावणारी पाणीटंचाई समस्या विंधन विहिरी अथवा साठवण टाक्यांच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करणार्या जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेला समाजभूषण विघ्नहर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे.मुंबई येथील श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ३१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता भायखळा मुंबई येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात होणार्या कार्यक्रम पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी सर्वप्रथम तालुक्यातील किंजळे तर्फे नातू येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलमंदिर उभारण्याची प्रत्यक्षात कृती करण्यास सुरूवात केली. २०१८ पासून ग्रामीण भागात भेडसावणारी पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.www.konkantoday.com