
चिपळूण येथील करंजेश्वरी देवीचा शेरणे कार्यक्रमात सोन्याची चेन चोरीस
चिपळूण तालुक्यातील करंजेश्वरी देवीचा शेरणे कार्यक्रमात पेठमाप येथील यात्रेदरम्यान ३५ हजार रुपये किंमतीची गळ्यातील सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी मंगळवारी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कौस्तुभ भरत शिंदे (३५, पाग उघडा मारूती चिपळूण) यांनी दिली आहे. प्रसिद्ध असणार्या शेरणे कार्यक्रमात अनेक भाविक येत असल्याने सर्वाधिक गर्दी होते असे असताना गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेत शिंदे यांच्या मुलीच्या गळ्यातील ६,२८० ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन चोरून नेली. हा प्रकार शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यानुसार त्यांनी चिपणूण पोलीस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com